Bajarbhav : शेवगा, कोबी, मिरचीची आवक वाढली

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी शेवगा, कोबी, हिरवी मिरची, काकडी, सिमला मिरची, टोमॅटो, बटाट्याची आवक वाढली
vegetables
vegetables sakal

नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी शेवगा, कोबी, हिरवी मिरची, काकडी, सिमला मिरची, टोमॅटो, बटाट्याची आवक वाढली, तर घेवडा, वाल, घोसाळी, डिंगरी, बीट, वाटाण्याची आवक घटली. मेथीची जुडी ४५ रुपयांना, लसूण ८० रुपये, वाटाणा ७० रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. ठोक स्वरूपात हिरवी मिरची ३० रुपये, घेवडा ८० रुपये, गवार १०० रुपये किलोने विकली गेली.

भाजीपाल्याची एक हजार १० क्विंटल आवक झाली. त्यात टोमॅटोची १०५ क्विंटल, बटाटा ४७५, वांगी ३६, फ्लॉवर ४७, कोबी १६७, काकडी ८७, गवार १७, कारली ३१, लसूण ८०, शेवगा ७५, भेंडी २९, सिमला मिरची १९ तसेच हिरव्या मिरचीची ५८ क्विंटल आवक झाली.

फळभाज्यांचे (क्विंटलचे) भाव : टोमॅटो एक ते दीड हजार रुपये, वांगी तीन ते पाच हजार, फ्लॉवर साडेतीन ते पाच हजार, कोबी दीड ते अडीच हजार, काकडी एक ते दीड हजार, गवार साडेनऊ ते अकरा हजार, घोसाळी साडेतीन ते पाच हजार, दोडका साडेतीन ते साडेचार हजार, कारली साडेतीन ते पाच हजार, भेंडी अडीच ते साडेतीन हजार, वाल पाच ते सहा हजार, वाटाणा साडेसहा ते सात हजार, घेवडा सहा ते आठ हजार, बटाटा दोन हजार ते दोन हजार दोनशे, लसूण पाच ते आठ हजार, लिंबू चार ते सहा हजार, हिरवी मिरची अडीच ते साडेतीन हजार, सिमला मिरची अडीच ते तीन हजार रुपये.

पालेभाज्या (शेकडा) : मेथी दोन ते अडीच हजार रुपये, पालक चार ते साडेपाच हजार, कोथिंबीर साडेतीन ते चार हजार रुपये. फळे (प्रतिक्विंटल) : मोसंबी तीन ते चार हजार रुपये, संत्री चार ते सहा हजार, डाळिंब आठ ते पंधरा हजार, पपई अडीच ते साडेतीन हजार, पेरू चार ते साडेसहा हजार, सीताफळ चार ते सात हजार, सफरचंद नऊ ते बारा हजार, ड्रॅगन फ्रूट सतरा ते वीस हजार रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com