अहमदनगर : श्रीगोंदयातील अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला मोक्का

MCOCA
MCOCA esakal

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : नगर व पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत सराईत झालेल्या व शिरूर, बेलवंडी, श्रीगोंदे, पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे केंद्र बनविलेल्या सहा जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई होणार आहे.

बेलवंडी पोलिस ठाण्यातून त्याबाबत प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिल्याची माहिती बेलवंडी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली. नगर व पुणे जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाईचा हा भाग समजला जातो.

MCOCA
अहमदनगर : आजिनाथ भोसलेच्या टोळीला मोक्का

दुधाळ म्हणाले, बेलवंडी, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर पोलिस ठाण्यात शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण (वय २८ वर्षे, सुरेगाव, ता.श्रीगोंदे) हा टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यासोबत राजु जावेद चव्हाण, घड्याळ्या हिरामण चव्हाण, रेबीन घड्याळ्या चव्हाण, ओंकार कुंज्या चव्हाण( सर्व सुरेगाव ), बाबुश्या चिंगळ्या काळे (वय २० वर्षे,रा.वांगदरी ता.श्रीगोंदा), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५ वर्षे, रा.पढेगाव ता.श्रीरामपुर, हा जावई आहे) या सहा जणांवर दरोडा टाकणे, स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून लूट करणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोड्याची तयारी करणे, फसवणूक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन दशहत निर्माण करुन केलेले नुकसान यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.

MCOCA
गाेव्याच्या दंगलीतील संशयित नाशिकमध्ये जेरबंद | Nashik

सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यासाठी बेलवंडी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होत. त्यास नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com