बॅंकेची सभा गोंधळाची होणार की शांततेत? प्राथमिक शिक्षकांमध्ये चर्चा

 District Primary Teachers Bank
District Primary Teachers Bank

नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची (District Primary Teachers Bank) सभा म्हटले की गोंधळ हा नित्याचाच उपक्रम ठरलेला आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या बॅंकेच्या सभेत गोंधळ होणार की सभा शांततेत होणार याविषयी आता शिक्षक सभासदांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी व विरोधकांच्या भूमिकेकडे सुमारे बारा हजार सभासदांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची सभेत नेहमीच गोंधळ होत असतो. या गोंधळामुळे शिक्षकांची प्रतिमा दरवर्षीच मलीन होण्याचे काम होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सभेत आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. एक दिवसाच्या ठरावीक शिक्षकांच्या गोंधळामुळे शिक्षकांची समाजातील पत कमी होत आहे.

कोरोना काळात शिक्षकांनी सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेऊन दीड कोटी पेक्षा जास्त मदत गोळा करून कोविड सेंटरला भेट दिलेली आहे. तसेच कोविड सेंटरलाही शिक्षकांनी ड्युटी केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांविषयी समाजाच्या मनात आदराचे निर्माण झालेले स्थान निर्माण झालेले आहे. हे स्थान अबाधित रहावे, अशीच अपेक्षा आता सर्वसामान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. मागील वर्षीची सभा कोरोनामुळे आॅनलाइन झाली होती. या आॅनलाइन सभेतही गोंधळ झाला होता. तसाच गोंधळ यावर्षीच्या आॅनलाइन सभेत होणार की सभा शांततेत होणार याविषयी सभासदांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. कायम रहावे, अशी अपेक्षा आता बॅंकेच्या शिक्षक सभासदांमधून व्यक्त होत आहे.

 District Primary Teachers Bank
कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’; विधिवत पार पडला सोहळा

कोरोनामुळे शिक्षक व समाज व्यवस्थेत अस्वस्थ वातावरण आहे. अशा वेळेस बॅंक व विकास मंडळाच्या चुकीच्या धोरणांना अभ्यासू पध्दतीने विरोध करून त्यांना कोंडीत पकडले पाहिजे. गोंधळ घालणे म्हणजे सभासद हित नव्हे.

- डॉ. संजय कळमकर, ज्येष्ठ शिक्षक नेते

सभासद हितासाठी नेहमीच विरोधक सभेमध्ये आपली मुद्दे मांडत असतात. त्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षीत असते. तसेच विरोधकांना सभेतही त्यांची मते विना अडथळा मांडून दिल्यास गोंधळाची परिस्थिती होत नाही.

- संजय शेळके, शिक्षक नेते

सत्ताधारी मंडळ विरोधकांच्या मुद्द्यांवर सविस्तर उत्तर देण्यास सदैव तत्पर आहे. विरोधकांनी आपले मुद्दे मुद्देसूद सदनशीर मार्गाने मांडावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाला आम्ही सत्ताधारी उत्तर देण्यास बांधिल आहोत. विरोधकांचे मुद्दे संपेपर्यंत सभा चालविली जाणार आहे. त्यामुळे मागील वर्षीची पुर्नरावृत्ती होऊ नये, याची काळजी विरोधकांनी घ्यावी.

-बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, गुरुमाऊली मंडळ.

कोरोना काळात शिक्षकांनी उल्लेखनिय कामगिरी करून कोविड सेंटरला मदत केलेली आहे. या कामामुळे शिक्षकांची पत समाजात उंचावलेली आहे. या कामाची जाण ठेऊन सभेमध्ये शिक्षकांची प्रतिमा मलीन होणार यादृष्टीने विरोधकांनी आपली मते मांडून प्रश्‍न सोडवून घ्यावेत. सर्वांनाच सभेत मत मांडण्यासाठी वेळ देण्यात येईल.

- सलीमखान पठाण, अध्यक्ष, शिक्षक बॅंक

 District Primary Teachers Bank
'होय, विधानसभा निवडणूक लढणार' - अनुराधा नागवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com