तिकिट कापले पण पक्षाने तेव्हा वसंतराव झावरेंनाच पाठिंबा दिला

Memorial Day of Vasantrao Jhaware
Memorial Day of Vasantrao Jhaware

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याच्या विकासात माजी आमदार वसंतराव झावरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जि.प. सदस्य सुप्रिया झावरे हे त्यांचा वारसा चालवित आहेत.

माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या जयंतीनिमित्त वासुंदे येथे आयोजित कार्यक्रमात विविध नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे, सुजित झावरे, सुदेश झावरे, बा. ठ. झावरे, पो. मा. झावरे, लहानू झावरे, दिलीप पाटोळे, मधुकर बर्वे उपस्थित होते. 

""राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2009मध्ये विधानसभा निवडणुकीत माजी आमदार (स्व.) वसंतराव झावरे यांचे तिकीट कापले. मात्र, त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर कधीही पायघड्या घातल्या नाहीत. पक्षाने दिलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने, पक्षाला झावरे यांनाच पाठिंबा द्यावा लागला. राज्यातील हे असे एकमेव उदाहरण असेल. ते कधीही राजकीय शक्तीसमोर झुकले नाहीत,'' असे प्रतिपादन माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी केले. 

पाटील म्हणाले, ""झावरे यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुक्‍यात पाणी अडविण्याच्या दृष्टीने फार मोठे काम केले, हे जनता कधीही विसरणार नाही.

काळू मध्यम प्रकल्प, भांडगाव मध्यम प्रकल्प, मांडओहोळ चारी अस्तरीकरण, पिंपळगाव जोगे कालवा, शिवडोह मध्यम प्रकल्प, पाच विद्युत उपकेंद्रांसह विविध योजनांतून 100 कोटींहून अधिक निधी त्यांनी तालुक्‍यात आणला. त्यांच्यानंतर असे मोठे प्रकल्प तालुक्‍यात झाले नाहीत, याची खंत वाटते.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com