...यामुळे फिरेल आता नगरमध्ये उद्योगाच चाक 

MIDC workers allowed to use motorcycles
MIDC workers allowed to use motorcycles

नगर : लॉकडाउनच्या काळात एमआयडीसीतील कामगारांना आपापल्या कंपनीत कामावर जाण्या-येण्यासाठी मोटरसायकल वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. एमआयडीसीपासून पाच किलोमीटर परिसरातील कामगारांना मोटरसायकलवर ये-जा करण्यास परवानगी देणारा आदेश लवकरच जारी होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीतील सुरू झालेल्या आणि सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या उद्योगांच्या चाकांना गती येणार असून, उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना मोटरसायकल वापरण्यास परवानगीसह अन्य प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) बैठक घेतली. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, उपअभियंता गणेश वाघ, असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्‍चरिंग इंडस्ट्रीजचे (आमी) अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनुराग धूत आदी उपस्थित होते. 

आवश्‍य वाचा ऍम्ब्युलन्समध्ये पेशंट नाही, निघाल भलतच... पोलिसही 

एमआयडीसीतील 323 कंपन्यांनी कार, मोटरसायकल वापरण्यास परवानगीसाठी केलेले अर्ज प्रशासनाने धुडकावले होते. पुन्हा अशी मागणी केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याची तंबीही दिली होती. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. "सकाळ'ने या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर आज झालेल्या "व्हीसी'द्वारे सरकारने सकारात्मक भूमिका घेत कामगारांना कामावर ये-जा करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. लॉकडाउनमध्ये उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी सरकारने कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीतील बहुतांश उद्योग सुरू झाले. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, कामगारांच्या प्रवेशाच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी, सॅनिटायझरची सुविधा आदी प्रशासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीही सुरू केली आहे. 

ड्यूटीपुरताच राहणार पासचा उपयोग 
एमआयडीसीतील पाच किलोमीटर परिसरातील कामगारांना ड्यूटीवर येण्यासाठी एक तासाचा वैयक्तिक पास दिला जाणार आहे. कामाव्यतिरिक्त कामगारांना हा पास घेऊन कुठेही फिरता येणार नाही; अन्यथा कारवाई केली जाईल, असा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत आहेत. 


एमआयडीसीतील 809 कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यातील 105 कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे कामगारांना ने-आण करण्यासाठी 139 बसेस धावण्यास परवानगी दिली आहे. नियमानुसारच परवानगी देण्याचे काम सुरू आहे. 
- अजय मोरे, उपजिल्हाधिकारी 

प्रशासनाने "व्हीसीद्वारे कामगारांच्या मोटरसायकलसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत हिरवा कंदील दाखविला. यावर लवकरच प्रशासन आदेश काढणार आहे. सरकार दिलासादायक निर्णय घेत असल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू होणार आहेत. बहुतांश तयार झालेला माल अमेरिका, सौदी अरेबिया या देशांमध्ये पाठवण्यास सुरवात झाली आहे. 
- अशोक सोनवणे, संस्थापक, असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्‍चरिंग इंडस्ट्रीज (आमी) 

एमआयडीसीतील कामगारांना कंपनीत ये-जा करण्यासाठी मोटरसायकलला परवानगी देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यावर लवकरच नियमावली तयार करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय केवळ जिल्ह्यापुरता राहणार आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com