Abdul Sattar
Abdul SattarGoogle

अब्दुल सत्तारांनी दत्तक घेतले पारगाव; ऐतिहासिक वैभव करणार जतन

नगर : गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचे ठरवले, तर काहीही अशक्य नाही. मात्र, अनेक ठिकाणी गावातील अंतर्गत वादामुळे विकासाभिमुख प्रकल्प बाजूला पडतात. व्याख्याते गणेश शिंदे यांच्या प्रेमामुळे पारगावला आलो. गावाचे ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी मी गाव दत्तक घेत असल्याचे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितले.

सत्तार म्हणाले, की पारगाव भातोडीची ऐतिहासिक कथा मी अनेकदा ऐकली आहे. याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजी राजे यांना वीरमरण आले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असूनही हा परिसर विकासात्मक व पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षित राहिला. मात्र, आता या गावाचा कायापालट करण्यासाठी हे गाव दत्तक घेत आहे, अशी घोषणा केली.

नगर तालुक्यातील पारगाव भातोडी या ऐतिहासिक गावास सत्तार यांनी भेट दिली. व्याख्याते शिंदे यांनी गावासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी केली होती. ती मान्य करत सत्तार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासह ७० लाख रुपयांच्या, गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड, सरपंच मीनाक्षी शिंदे, उपसरपंच ताराबाई भोसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात गणेश शिंदे यांनी खुमासदार शैलीत ग्रामीण भागातील समस्या उपस्थितांसमोर मांडल्या. याप्रसंगी ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या महागायिका ठरलेल्या पारगाव येथील सन्मिता शिंदे यांचा सत्तार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सागर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com