लसीकरणात मंत्री तनपुरेंचा 70-30 फॉर्म्युला

राहुरीतील प्रशासनाला दिल्या सूचना
लसीकरण
लसीकरण e sakal

राहुरी : तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत व तीन ग्रामीण रुग्णालयांत कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा डाटा घेऊन, त्यांना दुसरा डोस विहित मुदतीत मिळण्यासाठी निरोप दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यातील 70 टक्के व्यक्तींना, तर पहिल्या टप्प्यातील 30 टक्के व्यक्तींना लस देण्यास प्राधान्य राहील. (Minister Tanpur's 70-30 formula in vaccination)

लसीकरण
अॉक्सीजन लेव्हल ३६, बेडही मिळेना; तरी आजीबाई झाल्या ठणठणीत

पहिला डोस गावोगावी जाऊन दिला जाईल. त्यात, सुसूत्रता आल्यास जिल्हाभर हीच पद्धत राबविण्याचा मानस आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी येथे पंचायत समिती सभागृहात आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप साळवे, नगराध्यक्ष अनिल कासार, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, बाबासाहेब भिटे, अण्णासाहेब सोडनर उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, ""लसीकरण केंद्रे कोरोना "हॉट स्पॉट' ठरू नयेत, यासाठी राहुरी तालुक्‍यात लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी हेलपाटे मारू नयेत. 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल.'' पहिला डोस गावागावांत जाऊन देण्यात येणार आहे. 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनी कोविन ऍपवर नोंदणी करावी, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

(Minister Tanpur's 70-30 formula in vaccination)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com