Ahmednagar : आमदार काळेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

Ahmednagar : आमदार काळेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Ahmednagar - आगामी पावसाळ्यात आपत्ती आल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. आपत्ती अधिकाऱ्यांवरच आली आहे, असे समजून सामान्य जनतेच्या मदतीला धावून जा. आपत्तीच्या काळात जनतेला मदत करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून, योग्य नियोजन न झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती निवारण बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले आदींसह अधिकारी उपस्थित होते.

काळे म्हणाले, की सर्व पुलांच्या कामाची पाहणी करून घ्या. शहरातील ब्रिजलालनगर येथे येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा. मागील पावसाळ्यात ज्या ज्या भागात पाणी साचले आणि रहिवाशांचे नुकसान झाले, त्यामागची तेथील कारणे शोधा. पाणी काढून देण्यासाठी भुयारी जलवाहिन्या टाकणे, ओढे खोल करणे आणि अन्य कामे करण्यास प्राधान्य द्या.