200 बेडचे रुग्णालय उभारणार! आमदार लंके यांचा संकल्प

200 बेडचे रुग्णालय उभारणार! आमदार लंके यांचा संकल्प
Summary

लंके यांनी कोविड सेंटर तसेच तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात 200 बेडचे अत्याधुनिक व सुसज्ज असे रुग्णालय तसेच मतदारसंघातील कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचा संकल्प व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशा शब्दात आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लंके यांनी कोविड सेंटर तसेच तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. (MLA nilesh lanke has decided to set up a state of the art 200 bed hospital in parner taluka)

200 बेडचे रुग्णालय उभारणार! आमदार लंके यांचा संकल्प
राळेगणसिद्धी : महिला शेतकऱ्याची 'कूल' आयडिया, कामगारांसाठी केला 'हा' प्रयोग

गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी व मरणारी माणसेच खऱ्या अर्थाने जगतात. सेवेचा आनंद हा काही वेगळाच असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. मात्र, आज आमदार लंके यांनी उभ्या केलेल्या कामामुळे त्यांना तो आनंद अनुभवता येत आहे. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती, ही पाच तत्त्वे मला आमदार निलेश लंके यांच्यात दिसत असल्याचे सांगत हजारे यांनी कोरोना संकट काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. सामाजिक काम करताना कोणती काळजी घ्यावी, याचे कानमंत्र दिले.

200 बेडचे रुग्णालय उभारणार! आमदार लंके यांचा संकल्प
अखेर राळेगणसिद्धी, साकळाई येणार अंगणात... सर्वेक्षणाचे दिले आदेश 

पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अण्णांना गर्जा महाराष्ट्र हे पुस्तक भेट देत शुभेच्छा दिल्या. सरपंच राहुल झावरे, सरपंच सुभाष गाजरे, माजी सरंपच जयसिंग मापारी, नानाभाऊ मापारी, भालचंद्र दिवटे, दत्ता आवारी, राहुल खामकर, सत्यम निमसे, अमोल झेंडे, संदीप चौधरी, अशोक घुले, अभयसिंह नांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (MLA nilesh lanke has decided to set up a state of the art 200 bed hospital in parner taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com