MLA Radhakrishna Vikhe Patil has met Indorikar Maharaj
MLA Radhakrishna Vikhe Patil has met Indorikar Maharaj

आमदार विखे पाटील यांनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

संगमनेर (अहमदनगर) : पीसीपीएनडीटीच्या (प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कलमान्वये दाखल झालेल्या आरोपातून समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याबद्दल बुधवारी त्यांच्या ओझर खुर्द येथील निवासस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या लढाईत आपण कालही महाराजांबरोबर होतो, उद्याच्या लढाईतही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा सूचक संदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीतून दिला.

साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद; कर्मचारीही साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये वर्ग 
 
या वेळी इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नी यांचा यथोचित सत्कार करून, न्यायालयीन लढाईत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या वेळी विखे पाटील यांनी महाराजांकडून न्यायालयीन निकालाची माहिती जाणून घेतली. भविष्यात या संदर्भात कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेवरही चर्चा केली. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर आमदार विखे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका जाहीर केली होती. आजच्या भेटीतूनही त्यांनी, उद्याच्या लढाईत महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेतच दिले आहेत. 

या वेळी डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, भाजपचे नेते ऍड. रामदास शेजूळ, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरूनाथ उंबरकर, 'भाजयुमो'चे जिल्हा सचिव सचिन शिंदे, रवींद्र गाढे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com