आमदार रोहित पवारांकडून १५९० लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण

MLA Rohit Pawar fulfilled the dream of 1590 beneficiaries
MLA Rohit Pawar fulfilled the dream of 1590 beneficiaries

जामखेड (अहमदनगर) : जामखेड नगरपालिकेच्या क्षेत्रातील 933 घरकुल प्रकल्पांच्या उभारणीसाठी 11 कोटी 19 लक्ष 60 हजार तर कर्जत नगरपंचायती अंतर्गत 657 घरकुल प्रकल्प उभारणीकरिता पहिल्या टप्प्याचे अनुदान  तीन कोटी 94 लक्ष 20 हजार नगरपंचायतीच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेचे जामखेड नगरपालिकेतील 933 लाभार्थी आहेत.  कर्जत नगरपंचायतीतील 657 लाभार्थ्यी आहेत. राज्य व केंद्राकडून अनुदान सरकारस्तरावर प्रलंबित होते. याबाबत आमदार रोहित पवार यांनी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार 19 नोव्हेंबरला प्रधान सचिव गृहनिर्माण विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला. हे थकीत अनुदान त्वरित वितरीत होणेबाबत प्रधान सचिव गृहनिर्माण यांनी तात्काळ दखल घेत संबंधित आवास योजनेचे कर्जत नगरपंचायत व जामखेड नगर परिषद हे प्रलंबित अनुदान वितरीत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. 

24 तारखेला लेखाधिकारी, वित्त नियंत्रण,गृहनिर्माण भवन, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या पत्रान्वये कर्जत नगरपंचायत येथील 657 घरकुल प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्याचे केंद्र शासन अनुदान मिळवून तीन कोटी 94 लक्ष 20 हजार इतके अनुदान कर्जत नगरपंचायतीच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले.

जामखेड नगरपरिषद येथील एकूण 933 घरकुल प्रकल्पांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाचे अनुदान मिळवून 11 कोटी 19 लक्ष 60 हजार इतके अनुदान PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com