कर्जत-जामखेडमधील सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा अभिमान

MLA Rohit Pawar said that he is proud of the youth who have joined the army in Karjat Jamkhed 2.jpg
MLA Rohit Pawar said that he is proud of the youth who have joined the army in Karjat Jamkhed 2.jpg

जामखेड (अहमदनगर) : जामखेड तालुक्यातून 38 विद्यार्थी तर कर्जत तालुक्यातून 33 विद्यार्थी आर्मीत भरती झाले आहेत. ही बाब आपणासाठी अभिमानाची असून वर्षभरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यातून आर्मीत भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या पहिल्यांदाच पुढे आली. हा एक इतिहास ठरला आहे. त्यांचा गौरव करण्याची आपल्याला संधी मिळाली तो आपण आपला अभिमान समजतो. एवढ्या मोठ्या संख्येने सैन्यात मतदारसंघातील विद्यार्थी भरती होत आहेत हा आपला गौरव ठरतो आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

बुधवार (ता.2) रोजी जामखेड तालुक्यातील सैन्यात भरती झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या आईवडिलांसह जामखेड येथे गौरव करण्यात आला, यावेळी आमदार पवार बोलत होते. यावेळी कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रताप्राव देशमुख, रावसाहेब जाधव, गौतम केळकर,  प्रा.मधुकर राळेभात, मयूर भोसले, अमित जाधव, बबन काशीद, दत्तात्रेय वारे, सुर्यकांत मोरे, सेवानिवृत्त सैनिक हनुमंत जायभाय, बजरंग डोके, बापु शिंदे, दिगांबर ढवळे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आर्मीत भरती जालेल्या जवानांचा पालकांसह गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार पवार म्हणाले, यापुढेही दोन्ही तालुक्यातून आर्मीत सहभागी होणाऱ्या सर्वांचा त्यांच्या माता पिता सह आपण गौरव करणार आहोत. जेवण सीमेवरती मोठे कष्ट सोसून आपल्या देशाच्या सीमांचे संरक्षण करतात, म्हणूनच आपण सुरक्षित जीवन जगतो हे विसरून चालणार नाही. जवानांचा होत असलेला गौरव त्यांच्या कार्यापेक्षा फार छोटी बाब आहे. मात्र त्यांना सन्मान देणे, त्यांचा गौरव करणार हे आपलं कर्तव्य समजून आपण हे काम सुरू ठेवणार आहोत.

तसेच दोन्ही तालुक्यातील पोलिस संख्याबळ पुरेसे नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांनी यापुढील काळात जनतेच्या संरक्षणासाठी सेवेत सहभागी करून घेता यावे. याकरिता आपण जिल्हाधिकारी महोदयशी बोलणार आहोत. कोणाच्या काळात सेवानिवृत्त सैनिकांनी दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली याची जाणीव आपल्या सदैव मनात राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी सेवानिवृत्त सैनिक हनुमंत बारगजे यांनी आपले सेवेतील अनुभव विषद केले. यावेळी काही प्रसंग त्यांनी सांगितले आणि उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला. यावेळी बबन काशीद, रावसाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com