esakal | ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालणार नाही : आमदार रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar said that he will not pay attention to the Gram Panchayat elections

कर्जत- जामखेड मतदारसंघ माझे कुटुंब आहे. निवडणुकीचा निकाल लागला आणि राजकारण संपले.

ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालणार नाही : आमदार रोहित पवार

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड मतदारसंघ माझे कुटुंब आहे. निवडणुकीचा निकाल लागला आणि राजकारण संपले. मी स्थानिक पातळीवरील विशेषतः ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालणार नाही; मात्र तशी परिस्थितीच आली, तर अवश्‍य लक्ष देईल. आम्ही हवेत शब्द देत नाहीत, वा घोषणाबाजी करीत नाहीत. काम मंजूर होऊन निधी वर्ग झाल्यावरच सर्वांना सांगतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. 

जिल्हा प्रशासन, भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था प्रणित "परिवर्तन पर्व' एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरसेवक बापूसाहेब नेटके, रघुनाथ काळदाते, सुनील शेलार, नानासाहेब निकत, ऋषिकेश धांडे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""शिवरस्त्यांचा उपयोग सर्वांना करायचा असल्याने, त्यावरून जिरवाजिरवीचे राजकारण नको. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करायचे आहे. त्यासाठी श्रेयवाद अथवा राजकारण खपवून घेतले जाणार नाही. शिवरस्ता, पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी आवश्‍यक आहेत. मात्र, त्यासाठी समन्वय नसल्याने अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. कुणी समजून न घेता, मुद्दाम आडकाठी आणल्यास प्रसंगी कायदा आणि पोलिस बळाचा वापर करू; मात्र एक-दोघांचे हितसंबंध जोपासण्यापेक्षा जनतेला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.'' 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image