आमदार कोरोना काळात लोकांसाठी काय करू शकतो, पवारांचं काम बघा

वसंत सानप
Thursday, 24 September 2020

आमदार रोहित पवारांनी विविध सुविधा व उपाययोजना आमलात आणल्या आहेत. लॉकडाउनपासून आदार पवार सर्वच लोकांसाठी विविध योजना राबवित आहेत. 

जामखेड : जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरवर कर्जत येथे ५० तर जामखेड येथे ७० बेड  उपलब्ध करण्यात आले अाहेत. या सर्वच बेडला ऑक्सिजन पुरवण्यासाठी कर्जतच्या कोव्हीड सेंटरला २५० लिटरचे दोन सिलेंडर टॅंक देण्यात आले अाहेत. 

जामखेडलाही असेच दोन सिलेंडर टॅंक उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व रुग्णांना गरज भासल्यास ऑक्सिजन सुविधा पुरवली जाऊ शकणार आहे. जामखेडसाठी अगोदर ३ व्हेंटिलेटर होते. आता आमदार पवारांच्या पुढाकाराने उद्योजक रतन टाटा यांच्या मदतीने नव्याने ४ व्हेंटिलेटर मिळाले. 

आणखी २ व्हेंटिलेटर असे एकूण ९ व्हेंटिलेटर अत्यावश्यक सुविधा म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला.

कर्जतला डॉक्टरांची संख्या कमी असल्याने काही रुग्ण जामखेडला पाठवण्यात येणार आहेत. रुग्णवाहिकांचा तुटवडा पाहता कोणत्याही आणि कुठल्याही रुग्णाला वेळेत उपचार घेता यावेत यासाठी कर्जत तालुक्यासाठी  १ व जामखेड तालुक्यासाठी १ अशा २ रुग्णवाहिका आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून मिळणार आहेत.

वैद्यकीय उपकरणे दिली

अधिकची काळजी म्हणून नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी कर्जतसाठी ६० ऑक्सिमिटर व ६० थर्मामीटर, जामखेडसाठीही ६० ऑक्सिमिटर व ६० थर्मामीटर त्यांनी दिले आहेत. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून मोफत भोजन दिले जात आहे.

आमदार रोहित पवारांनी विविध सुविधा व उपाययोजना आमलात आणल्या आहेत. लॉकडाउनपासून आदार पवार सर्वच लोकांसाठी विविध योजना राबवित आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांसाठी दोन्ही तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणे निश्चित करून विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात व जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोव्हीड सेंटर उभारले आहे.

सर्वात मोठे कोव्हीड सेंटर

वैयक्तिक मदतीने सर्वात मोठे कोव्हीड सेंटर
कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरीकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार यांनी व्यक्तिगत मदत देत सर्वात मोठे कोव्हीड सेंटर उभारले आहे. वैद्यकीय सुविधेपासुन इतर सर्वच बाबी आमदार पवार मोफत देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar's help for the people