पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून पुन्हा वळती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी केली आहे. 

नगर ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा झाली. ही रक्कम वसूल करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने निर्देश ठरवून दिले आहेत. मात्र, त्यानुसार कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी केली आहे. 

पत्रकात तरटे यांनी म्हटले आहे, की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा झाली. ही चूक प्रशासनाची आहे. त्यांच्यामुळेच अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले.

आता हे पैसे वसूल करण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. या रकमेची वसुली कशी करावी, याबाबत शासननिर्देश दिलेले असताना, त्यानुसार कामकाज केले जात नाही. पैशांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची खाती गोठविणे, शेतकऱ्यांची परवानगी न घेता खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकार बॅंक व्यवस्थापन व महसूल प्रशासनाने सुरू केले आहेत.

यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तरटे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money deposited in farmers' accounts due to administration's mistake