esakal | समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी नदी, नाले, ओढ्यांना पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

More rain in Akole taluka this year than last year

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणी साठा अधिक झाला आहे. गतवर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यातील बंधार्‍यात अद्याप पाणी आहे.

समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी नदी, नाले, ओढ्यांना पाणी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणी साठा अधिक झाला आहे. गतवर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यातील बंधार्‍यात अद्याप पाणी आहे. विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असून हवामान विभागाने यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने यावर्षीचा खरीप हंगाम फलदायी होईल, अशी ग्वाही देत त्यासाठी कृषी खात्याने आवश्यक बी बियाणे, खते, किटक नाशक औषधे, कृषी औजारे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार रास्त दरात बांधावर पोहोचविण्याचे नियोजन केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी दिली आहे.

अकोले हा प्रामुख्याने रब्बीचा तालुका समजला जात असला तरी बदलत्या निसर्गामुळे आता खरीप व रब्बी असे हंगाम राहिले नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही कृषी विभागाच्या माध्यमातून प्रतिवर्षी राज्यभर खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी खरिपाचे नियोजन करताना नैसर्गिक वातावरण व हवामानाच्या अंदाजामुळे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी अधिक समाधानी दिसून आले नाहीत. तालुका कृषी अधिकार्‍यांनी यावर्षी खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा 30 टक्के अधिक पेरा झाला असला तरी अवकाळी पाऊस व किडीचा प्रादुर्भाव, बोगस बियाणे यामुळे पिकांना अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अकोले तालुक्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र गतवर्षी 36365. 33 तर या वर्षी 40556  हेक्टर इतके असून त्याशिवाय ऊसाखालील क्षेत्र सुमारे चार हजार हेक्टर असल्याचे सांगितले आहे. खरीप हंगामातील बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र गतवर्षी 3251.70 मात्र यावर्षी 3675 अधिक हेक्टरवर बाजरीचा पेरा होईल. तर मक्याचे गतवर्षी क्षेत्र 3081 हेक्टर असले तरी यावर्षी पाच हजार 230 हेक्टरहुन अधिक क्षेत्रावर मक्याचा पेरा अपेक्षीत असल्याचे निदर्शनास आणून देत तृण धान्याखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षीत असल्याचे तालुका कृषी अधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

भुईमुगाचे गतवर्षी 767. 60तर आज 1138 हेक्टर क्षेत्र, सूर्यफूल 332हेक्टर, सोयाबीन गतवर्षी 8017. 60 हेक्टर असून सोयाबीनच्या 10562 हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षीत असल्याचे नमूद करीत तूर, उडीद, मूग इतर कडधान्य यासाठी 524.33  हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाच्या क्षेत्रात भरीव वाढ आतापर्यंत भंडारदरा, निळवंडे, आढळा, पिंपळगाव खांड सांगवी, आंबित, बलठाण या धरणावर तालुक्यातील एक तृतीयांश क्षेत्र ओलिताखाली येत असे मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या धरणांमुळे आगामी काळात नियोजन पूर्वक विशेषतः ऊसासाठी ठिबकचा वापर अनिवार्य केल्यास संपूर्ण तालुका 100 टक्के बागायत होऊ शकेल. त्यादृष्टीने विचार करता ऊसाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 

आगामी गळीत हंगामात गाळपास येणारे ऊस क्षेत्र 4000 हेकटर असून 1378. 69 हेक्टर खोडवा आडसाली 338. 80 अशी वर्गवारी असल्याचे अगस्ती कारखान्याचे कृषी अधिकारी सोमनाथ देशमुख  यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 500 हेक्टरवर फळबागा उभ्याधरणात मिळून यावर्षी सुमारे 26  टीएमसी पाणी साठा आहे, विहिरींमध्ये पुरेसे समाधानकारक पाणी आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 

loading image