बोगस बियाण्यांबाबत खासदार लोखंडे म्हणतात...

MP Lokhande says about bogus seeds
MP Lokhande says about bogus seeds

नगर ः खरीप हंगामात पेरलेले बियाणे बोगस असल्याने त्याची उगवणच झाली नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. 

लोखंडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन बोगस बियाण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""बोगस बियाणे प्रकरणात संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, कंपनीकडूनच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी केली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये. 

गुरुपौर्णिमेला घरूनच करा साईंचे स्मरण 
लोखंडे म्हणाले, ""गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने भाविकांना शिर्डी येथे येण्यास सप्त मनाई केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यावी. गुरुपौर्णिमेला शिर्डी येथे येऊ नये. आपापल्या घरी बसूनच साईबाबांचे स्मरण करीत मनोमन दर्शन घ्यावे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com