शिर्डीला स्मार्ट सिटीचा दर्जा द्या; खासदार लोखंडेंची लोकसभेत मागणी

Shirdi MP Sadashiv Lokhande
Shirdi MP Sadashiv LokhandeEsakal

शिर्डी ( जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने साईबाबांच्या शिर्डीला स्मार्ट सिटीचा दर्जा देऊन येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग व विमानतळ या सुविधा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे आयटी पार्क व अन्य रोजगार निर्मितीचे व्यवसाय येथे सुरू होऊ शकतील. तसेच देश-विदेशातील भाविकांनाही येथे वास्तव्य करणे सुलभ होईल, अशी मागणी आपण आज लोकसभेत केली, अशी माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यासाठी भौगोलिक स्थान व एक लाख लोकसंख्येची अट आहे. मात्र शिर्डीची लोकसंख्या ३६ हजार असली, तरी येथे दररोज लाखभर भाविक येतात. गर्दीच्या काळात ही संख्या चार ते पाच लाखांवर जाते. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषाची अडचण येणार नाही. याकडे आपण सदनाचे लक्ष वेधले. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आपल्या मागणीला प्रतिसाद दिला. आता आपण राज्य व केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार आहोत. राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे धाडला, तर त्यावर विचार करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे संकेत आपणास मिळाले आहेत. शिर्डीला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला, तर येथील अर्थकारण पुरते बदलून जाईल. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आपण हा विषय तडीस नेण्याचे ठरविले आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व हवाईसेवा तसेच समद्धी महामार्ग एवढ्या सुविधा उपलब्ध असलेली साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान आहे. याबाबी आपण केंद्र सरकारच्या नजरेस आणून दिल्या आहेत.

Shirdi MP Sadashiv Lokhande
अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभाग : नऊशे कोटी वसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com