... अन्‌ तीन महिन्यानंतर ते पोहोचले आपल्या घरी

MP Lokhande helps rescue three youths in Nigeria
MP Lokhande helps rescue three youths in Nigeria

अकोले (अहमदनगर) : शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नाने नायझेरियात कामानिमीत्त गेलेले व लॉकडाऊनमुळे अडकलेले अकोल्यातील दोन व पुण्यातील एक असे तीन तरूण मायदेशी परतले असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी दिली.
मंडलिक म्हणाले, पुण्यातील एका कंपनीने अकोल्याचे राजेंद्र भास्कर वाळुंज व मिर्झासाहेब दिलावर शेख तसेच पुण्याचा निलेश ज्ञानदेव थिटे या तीन तरुणांना नायझेरियात पाठविले होते. तेथे एका कंपनीच्या प्रोजेक्टसाठी 20 मार्चला हे तिघेही गेले. 17 एप्रिलला त्यांच्या प्रोजेक्टचे काम पूर्ण करून ते भारतात परतणार होते. परंतु कोरोना्‍मुळे या तिघांनाही नायझेरियात 15 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर 31 मे रोजी त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला. भारतात परतणार तोच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे विमाने बंद म्हणून त्यांना मायदेशी परतता आले नाही. मायदेशी परतण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून भारतीय व नायझेरियातील दुतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी खासदार लोखंडे यांचेशी संपर्क करून त्यांचेमार्फत प्रयत्न सुरू केले. खासदार लोखंडे यांनी तातडीने योग्य ती प्रक्रिया करुन नायझेरियन दुतावास यांचेशी संपर्क केला. त्यानंतर नायझेरिया ते मुंबई व मुंबई ते पुणे- अकोले अशी प्रवासासाठी परवानगी काढुन दिली.  ते तिघेही आपल्या घरी सुखरूप पोहोचले. खासदार लोखंडे यांचे वाळुंज, शेख व थिटे परिवाराने आभार मानले तर अगस्ती कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वसंत मनकर, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नगरसेवक प्रमोद मंडलिक आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com