महावितरणची नाशिक परिमंडलात ७५ कोटींची वसुली

MSEDCL recovers Rs 75 crore in Nashik circle
MSEDCL recovers Rs 75 crore in Nashik circle

नगर ः महावितरणने ऑक्‍टोबर 2020मध्ये थकबाकी वसुलीसाठी विविध सवलती जाहीर केल्या. तेव्हापासून राज्यात 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी 312 कोटी 41 लाख रुपये आजपर्यंत भरले आहेत. त्यात नगर जिल्ह्यात 44 कोटी 75 लाख रुपये, तर नाशिक परिमंडळात 75 कोटी 18 लाख रुपयांची वसुली झाली आहे. 

महावितरणच्या वसुली मोहिमेला काही शेतकऱ्यांनी विरोधही दर्शविला. थकीत वसुलीसाठी महावितरण सक्‍ती करीत असल्याचा आरोपही झाला. या योजनेंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला.

ही योजना तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 50 टक्के सवलत, तसेच व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे.

दोन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 30 टक्के, तर तीन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. 
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच, सप्टेंबर 2015नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्ण माफ होणार आहे.

गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावातील वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com