जिल्हा परिषदेची सभा होणार अॉनलाईन

Zilla Parishad meeting to be held online
Zilla Parishad meeting to be held online

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सभा-संमेलने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची 26 फेब्रुवारीला सभागृहात होणारी सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव वासुदेव सोळंके यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या आहेत. तसेच सभा-संमेलने घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशान्वये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याऐवजी ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने ऑनलाइन सभा घेण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्याचे सूचित केले आहे.

या निर्णयामुळे सदस्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, ऑनलाइनऐवजी ऑफलाइन सभा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. कोरोनाच्या नावाखाली प्रशासन पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची दिशाभूल करून प्रश्‍नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. 

सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे टाळण्यासाठी कोरोनाचा आधार घेत सभा सभागृहात न घेता ऑनलाइनचा घाट घातला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचेच राज्य सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. 
- जालिंदर वाकचौरे, गटनेते तथा सदस्य, जिल्हा परिषद 

जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य सुशिक्षित असून, प्रत्येक जण सुरक्षा नियमांचे पालन करीत आहे. सभागृहात सभा घेणे शक्‍य नसेल तर जिल्हा परिषदेने मंगल कार्यालयात सभा घ्यावी. जनतेच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सभागृहात सभा होणे गरजेचे आहे. 
- शालिनी विखे पाटील, सदस्य, जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com