‘लंपी’ने नगर जिल्ह्यात आतापर्यंत 456 जनावरे बाधित; अकरा तालुक्‍यात फैलाव

दौलत झावरे
Tuesday, 22 December 2020

लंपी या संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांपैकी 12 तालुक्‍यात फैलाव केला.

अहमदनगर : लंपी या संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांपैकी 12 तालुक्‍यात फैलाव केला असून 465 जनावरांना बाधा झाली आहे. या सर्व जनावरांनी लुंपीवर मात केली असून त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे मोठे योगदान आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लुंपीने सर्वात प्रथम नेवासे तालुक्‍यात शिरकाव केला. नेवाशातील काही जनावरांना लंपी आजाराची लागण झाली. त्यानंतर जिल्ह्यात या आजाराने शिरकाव केला आहे. आतापर्यंत संगमनेर व श्रीरामपूर तालुक्‍यात अद्याप या तालुक्‍यात या आजाराने शिरकाव केला नाही. इतर तालुक्‍यांमध्ये या आजाराने फैलाव केलेला आहे. सध्या शेवगाव, राहाता, कोपरगाव पाथर्डी, कर्जत, जामखेड आदीं तालुक्‍यात कमी अधिक प्रमाणात झाला.

लंपी आजाराने आता नगर तालुक्‍यात शिरकाव केला असून गुंडेगाव (ता. नगर) मध्ये काही जनावरांना लंपी आजाराची लागण झाली. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे या जनावरांवर उपचार सुरु आहेत. तालुक्‍यातील इतर गावात हा संसर्ग पसरु नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

जिल्ह्यातील 12 तालुक्‍यांतील 62 गावांत हा संसर्ग पोहोचला आहे. आतापर्यंत 456 जनावरांना या आजाराची बाधा झाली असून, सर्व बरी झाली आहेत. कर्जत तालुक्‍यात सर्वाधिक 250 जनावरे बाधित झाली आहेत. जनावरांना लंपी आजार होणार नाही, यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. लंपी संसर्ग वाटल्यास तत्काळ जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagar district 456 animals were infected due to Lampi disease