esakal | नगर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar District Deputy Chief of Shiv Sena Anil Karale passed away

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शक्रवारी (ता. १३) दुः खद निधन झाले.

नगर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे यांचे निधन

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शक्रवारी (ता. १३) दुः खद निधन झाले. कराळे यांच्या निधनाने ऐन दिवाळीच्या सणात जिल्ह्यातील शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर त्यांचे गाव असलेल्या कामत शिंगवे (ता. पाथर्डी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पूर्वीपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले अनिल कराळे हे गेल्या निवडणुकीत तालुक्यातील करंजी मिरी गटातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते तर त्या पूर्वी त्यांच्या पत्नी अनुराधा कराळे या याच गटातून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. कामत शिंगवे येथील सेवा सोसायटी व ग्रामपंचातीवर गेल्या 15 वर्षपासून त्यांच्या गटाची सत्ता होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे ते कट्टर समर्थक होते.

गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल मध्ये उपचार चालू होते. या काळात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली होती. अत्यंत आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती . राज्याच्या राजकारणात डॉ नीलम गोऱ्हे व माजी मंत्री विजय शिवथरे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे ते खंदे समर्थक होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कामत शिंगवे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांच्या मागे आई,भाऊ,भावजयी,पत्नी व दोन मुले असा परिवार असून आज सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्यावर कामत शिंगवे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर