Dadasaheb Pathare was elected as the President of Parner Taluka Cooperative Milk Producers and Processing Team.jpg
Dadasaheb Pathare was elected as the President of Parner Taluka Cooperative Milk Producers and Processing Team.jpg

पारनेर तालुका दूध संघावर प्रशासक; दादासाहेब पठारे अध्यक्ष; रोहोकले, थोरात सदस्य

पारनेर (अहमदनगर) : पारनेर तालुका सहकारी दूधउत्पादक व प्रक्रिया संघावर येथील दादासाहेब पठारे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली, तर सदस्यपदी संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांची नियुक्‍ती करण्यात आली.
 
तालुका दूध संघाचे पुनरुज्जीवन 16 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते. नंतर हंगामी समितीची एक वर्षासाठी नेमणूक केली होती. त्या समितीची मुदत 15 नोव्हेंबर 2018 रोजी समाप्त झाली होती. त्या समितीने मुदत संपण्यापूर्वी राज्याच्या सहकारी संस्थेच्या नियमानुसार निवडणूक घेणे गरजेचे असताना, त्यांनी मुदतीत निवडणूक घेतली नाही.

याबाबत आमदार नीलेश लंके यांनी दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे, संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती व चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर एन. ए. ठोंबरे यांची लेखापरीक्षक म्हणून नेमणूक केली. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात नारायणगव्हाण येथील सरकारी दूध शीतकरण केंद्र खरेदीपोटी 16 लाख 86 हजार इतकी रक्कम शासकीय दूध योजनेकडे 28 सप्टेंबर 2007 रोजी भरली. मात्र, आजअखेर मालमत्तेचे हस्तांतर व खरेदीखत केले नाही.

तसेच, संघाच्या मालकीचे सुपे येथील दूधशीतकरण केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या ठिकाणची साधनसामग्री निरुपयोगी झाली. ती विकण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, ती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान, जुन्या समितीची मुदत संपल्याने व निवडणूक प्रक्रिया राबविणे गरजेचे असतानाही ती न राबविल्याने पठारे यांच्या अध्यक्षतेखाली रोहोकले व थोरात यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती राज्याच्या पशू व दुग्धविकास मंत्रालयाने केली. या नियुक्‍तीमुळे आमदार लंके यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धक्‍का दिला आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com