अर्बन बँकेतील रकमा संचालकांशी संबंधितांकडे;आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

संचालकांशी संबंधित व्यक्तींची कर्जप्रकरणे मिटविण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी गायकवाडच्या नावे घेतलेल्या कर्जप्रकरणांच्या रकमा संबंधित कर्जखात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले
nagar Urban Bank scam Investigations are underway Financial Crimes Branch loan case  ahmednagar
nagar Urban Bank scam Investigations are underway Financial Crimes Branch loan case ahmednagaresakal

अहमदनगर : नगर अर्बन बँकेत कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदे) सध्या पोलिस कोठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू आहे. संचालकांशी संबंधित व्यक्तींची कर्जप्रकरणे मिटविण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी गायकवाडच्या नावे घेतलेल्या कर्जप्रकरणांच्या रकमा संबंधित कर्जखात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या २८ संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळच्या असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटींची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपी गायकवाड याच्याशी संबंधित घृष्णेश्‍वर मिल्क व जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन या कंपन्यांच्या कर्जखात्याची व बँकखात्याची तपासणी सुरू केली आहे. कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग इतर कारणासाठी झाल्याचे समोर आले आहे. काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळच्या काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे बँकेतील व्यवहारांमधून समोर येत असल्याने, या रकमा कोणाकडे वळविल्या गेल्या, या सर्व प्रकारांमध्ये कोणाची साथ होती, यात संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी गायकवाड याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com