नगर झेडपीची वेबसाईट हॅक...अध्यादेशच ठेवले झाकून

Nagar ZP's website hacked ...
Nagar ZP's website hacked ...

नगर ः अहमदगर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील प्रशासनाचे अध्यादेश झाकून ठेवले आहेत. प्रशासनाकडून तांत्रिक अडचण आल्याचे सांगितले जाते. मात्र, ही वेबसाइट "हॅक' झाल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. 

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक आदी माहिती आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून, जिल्हा परिषद राबवीत असलेले उपक्रम व योजनांच्या माहितीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अध्यादेश प्रसारित केले जात आहेत.

हे अध्यादेशच संकेतस्थळावरून आता गायब झाले आहेत. पूर्वी या अध्यादेशांचा फॉन्ट बदलण्यात आला होता. या बाबत दुरुस्तीचे कामकाज सुरू होते. मात्र, ते अद्यापि झालेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ "हॅक' झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाशी संपर्क साधला असता, "संकेतस्थळाला तांत्रिक अडचण आली आहे. त्याची दुरुस्ती करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. दुरुस्तीचे कामकाज लवकरच पूर्ण होईल,' असे सांगण्यात आले. 

360 अध्यादेश रिकव्हर 
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर 12 हजार अध्यादेश होते. त्यांपैकी फक्त 360 अध्यादेशच रिकव्हर होत आहेत. त्यामुळे संकेतस्थळ "हॅक' केल्याची चर्चा खरी असल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. साईट सुरू केल्यानंतर धीस साईट इज अंडर कन्स्ट्रक्शन असा मेसेज येतो आहे.

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com