कांदा निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी श्रीरामपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन

NCP agitation in Shrirampur to lift onion export ban immediately
NCP agitation in Shrirampur to lift onion export ban immediately

श्रीरामपूर (अहमदनगर) : केंद्रातील भाजपा सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागु केल्याने कांद्याचे दर घटणार असुन शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीसमोर आज केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्षा अर्चना पानसरे, शहराध्यक्ष लकी सेठी, युवक तालुकाध्यक्ष गणेश ठाणगे, शहराध्यक्ष योगेश जाधव, भाऊ डाकले, डॉ. विलास आढाव, दिपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, भागचंद औताडे उपस्थित होते.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना वरील मगणीचे निवेदन आज दिले. केंद्र सरकारने लागु केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे संताप व्यक्त करत तातडीने कांदा निर्यातबंदी रद्द करुन शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी आदिक यांनी केली. तसेच बोर्डे यांनी मनोगत व्यक्त करुन केंद्र सरकारच्या निणर्याचा निषेध केला.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com