esakal | राष्ट्रवादीला धक्का! नगर जिल्ह्यात मनसेत इनकमींग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

NCP taluka president enters MNS leader in Parner taluka

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या कोणत्याही निवडणुका नसातानाही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.

राष्ट्रवादीला धक्का! नगर जिल्ह्यात मनसेत इनकमींग सुरु

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या कोणत्याही निवडणुका नसातानाही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे अनेक गावात नवनविन कार्यकर्ते जोडण्याचे काम पक्षाने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नव्याने मनसेकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात तालुक्यात मनसे मोठी उभारी घेईल, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी पक्षाचा राजिनामा देऊन मनसेत प्रवेश केला. त्या नंतर लगेचच त्यांची पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचा परिणाम तालुक्यात पक्षाने उभारी घेतली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतर लगेचच तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्याचा सपाटा लावला आहे. अनेक गावात कार्यक्रम घेऊन त्यांनी कार्कर्ते जोडण्यास सुरूवात केली आहे. नुकताच वडझिरे येथे माळी यांच्या उपस्थीतीत अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. 

पारनेर शहरात शहराध्यक्ष वसीम राजे यांनी तालुक्याच्या ठिकाणी कोरोना काळात गरजूंना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप कले आहे.त्यांनी शहरात सध्या ध्वणीफिती द्वारे कोरोना विषयक जनजागृती सुरू करूण एक चांगले सामाजिक काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातून पारनेर शहरात विविध कामानिमित्ताने येणा-या लोकांचेही कोरोना बाबत चांगले प्रबोधन होत आहे.

माळी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नुकताच वडझिरे येथे कार्यक्रमात झाला अवघ्या आठवडाभरातच पक्ष संघटनेला बळ मिळण्यास सुरूवात झाली असल्याचा प्रत्येय येथे आला. माळी यांच्या उपस्थीतीत झालेल्या या कार्यक्रमात या वेळी अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. 

या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, प्रकाश राजदेव, निखिल बोरकर, स्वप्निल आतकर, सौरभ बेलोटे आदी मान्यवर उपस्तीत होते.
आम्ही लवकरच तालुका दौ-याचे नियोजन करत आहोत. गाव तेथे शाखा ही आमची संकल्पना आहे. मनसेत इतर पक्षातील अनेक नाराज कार्यकर्ते येण्यास तयार आहेत. भविष्यात तालुक्यातील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत व पारनेर नगरपंचायतीची निवडणुक आम्ही स्वबळावर लठविणार आहोत-बाळासाहेब माळी, तालुका अध्यक्ष मनसे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image