जमावबंदीच्या आदेशाचा भंग करत नेवासेत तहसीलदारांचा वाढदिवस

Tehsildar birthday in Nevasa in violation of curfew order
Tehsildar birthday in Nevasa in violation of curfew order

सोनई (अहमदनगर) : राज्यात कोरोना व्हायरसची गंभीर स्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करत नेवासेचे तहसीलदार यांनी सोशल डिस्टन्सिगचे नियम न पाळता केलेल्या वाढदिवसाची चौकशी करुन कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. 16) छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने पांढरीपुल येथे रास्तारोको केले जाणार आहे.

वाढदिवसप्रकरणी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करण्याबरोबरच त्यांच्या कारभाराची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी मागणी छावा सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांचे गावात उपोषण सुरु आहे. दोन दिवसात प्रशासनाचे कुणीच न फिरकल्याने नगर- औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपुल येथे रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन काळे यांनी वरिष्ठांना दिले आहे. कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन असतानाही नेवासा तालुक्यातून कोट्यावधी रुपयांची वाळू तस्करी झाली. त्यास तहसीलदार सुराणा जबाबदार असल्याचा आरोप करुन याची सखोल चौकशी करण्याची मागणी यापूर्वी निवेदनाद्वारे सर्वसंबंधितांकडे केल्याकडे केली. तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरित्या बेसुमार गौण खनिज उत्खनन होऊन त्याची तस्करी झाल्यामुळे सरकच्या तिजोरीला कोट्यावधीचा फटका बसला आहे. याशिवाय सर्व नियम तोडून केलेल्या वाढदिवसाची चौकशी करुन कारवाई व्हावी, असा आरोप काळे यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात केलेला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com