निळवंडे अर्ध्यावर, तर भंडारदरा धरणात इतका झाला पाणीसाठा

The Nilwande dam is half full.
The Nilwande dam is half full.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रासह कळसूबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान, आज (गुरुवारी) सकाळी निळवंडे धरण निम्मे (50 टक्के) भरले, तर भंडारदरा धरणात 34 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच धरणे काठोकाठ भरली होती. त्यातच दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात पाण्याची मागणीही काही प्रमाणात कमी होती. त्यामुळे यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणांमध्येच मुबलक पाणीसाठा शिल्लक होता. निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले अखेरचे आवर्तन 22 जून रोजी बंद झाले, त्यावेळी या धरणातील पाणीसाठा 3501 दशलक्ष घनफूट इतका होता. 

पावसाचे सातत्य टिकून 

भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रातही पावसाचे आगमन यंदा लवकर झाले. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे सातत्य टिकून आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणांत नवीन पाण्याची आवकही सुरू झाली. कळसूबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचे सातत्य टिकून असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजली जाणारी कृष्णवंती नदी प्रवाही झाली. 

निळवंडेत 45 दशलक्ष घनफूट नवे पाणी 

वाकी येथे बांधलेला 112 दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाझर तलाव मंगळवारी (ता.7) सकाळी भरून वाहू लागला. या तलावावरून 256 क्‍यूसेकने पाणी नदीपात्रात झेपावत होते. या पाण्यासह भंडारदरा धरणाखालील परिसरातील सर्व पाणी निळवंडे जलाशयात येत असते. आज (गुरुवारी) सकाळी निळवंडे धरणात 45 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने आले आणि 8320 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या निळवंडे धरणातील पाणीसाठा 50 टक्के झाला. आज सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 4164 दशलक्ष घनफूट इतका झाला होता. 

भंडारदरात 3760 दशलक्ष घनफूट पाणी 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अंतरा-अंतराने पडत आहेत. त्यामुळे ओढे-नाले प्रवाही झाले आहेत. त्यामुळे आज सकाळी भंडारदरा धरणात 3760 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. भंडारदरा 45, घाटघर 67, पांजरे 52, रतनवाडी 57, वाकी 40 मिलिमीटर पाऊस झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com