अहमदनगर जिल्ह्यातून नऊ गुन्हेगार हद्दपार

पोलिस अधीक्षकांचा आदेश; छिंदम बंधूंचा समावेश
टोळी हद्दपार
टोळी हद्दपारsakal

अहमदनगर - तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत नऊ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत नऊ आरोपींविरुद्ध तोफखाना पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी देत, याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. नऊ गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.

श्रीपाद शंकर छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत शंकर छिंदम (दोघे रा. मोहनबाग, दिल्लीगेट) या दोघांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे कलीम सलीम शेख (रा. रामचंद्र खुंट, अहमदनगर) व गौरव प्रभाकर साळवे (रा. नीलक्रांती चौक, अहमदनगर) यांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे, गौरव राजेंद्र गायकवाड, अभिषेक ऊर्फ घाऱ्या दिलीप लोणारे, अमोल हिरामण गायकवाड, स्वप्नील सुनील पारधी (सर्व रा. नीलक्रांती चौक, अहमदनगर) यांना १८ महिन्यांकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

या सराईत गुन्हेगारांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलिस अंमलदार विकास खंडागळे, विनोद गिरी यांनी यासाठी परिश्रम घेतले. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिन्यांकरिता हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार गौरव राजेंद्र गायकवाड (वय २२, रा. नीलक्रांती चौक, अहमदनगर) हा बुधवारी सायंकाळी नीलक्रांती चौकात मिळून आल्याने तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार चेतन मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com