
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा पहिल्यांच ऑनलाईन होणार आहे. मंगळवारी (ता. 21) दुपारी होणाऱ्या या सभेत 21 विषय असून त्यातील एक विषय महापालिकेच्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या खासगीकरणा संदर्भातील आहे. त्यामुळे उपमहापौर मालन ढोणे यांनी स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांना निवेदन देऊन या परीक्षा केंद्राचे खासगीकरण करू नये अशी मागणी केली आहे.
नगर : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा पहिल्यांच ऑनलाईन होणार आहे. मंगळवारी (ता. 21) दुपारी होणाऱ्या या सभेत 21 विषय असून त्यातील एक विषय महापालिकेच्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या खासगीकरणा संदर्भातील आहे. त्यामुळे उपमहापौर मालन ढोणे यांनी स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांना निवेदन देऊन या परीक्षा केंद्राचे खासगीकरण करू नये अशी मागणी केली आहे.
अवश्य वाचा - नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
निवेदनात म्हटले आहे की, नगर महापालिकेने 2007मध्ये नगर शहर व आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना मोफन स्पर्धा परीक्षेचे शिक्षण व मार्गदर्शन मिळावे याकरीता हे केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना त्यांची परीक्षा घेण्यात येउन त्यात यशस्वी झालेला किमान 100 विद्यार्थाना येथे प्रवेश देण्यात येत होता.
या परीक्षा केंद्रात 2018पर्यंत 1100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यापैकी 500पेक्षाही जास्त विद्यार्थी शासनाच्या स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण झाले आहेत. 100पेक्षाही जास्त विद्यार्थी शासनाच्या सेवेत विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. यामुळे या स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव देशपातळीवर आहे. तसेच नगर महापालिका ही राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबविणारी पहिली महापालिका आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्राची पहाणी करण्यासाठी राज्याभरातून महापालिका, नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी येथे येतात. महापालिका ही व्यवसाय करणारी संस्था नसून सेवा देणारी संस्था आहे.
प्रमोदजी महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खासगी संस्था चालकांना देण्यात येउ नये. हा प्रकल्प महापालिकेने स्वतः सुरू करण्यासाठी 2020-21च्या अर्थसंकल्पात 15 लाख रुपयांची तरतूद करणेबाबतचा ठराव मंजूर करावा व तसे प्रशासनास आदेश दयावेत, असे निवेदनात म्हटले आहे.