
केंद्र सरकारने शेतकरीहितासाठी कृषी कायदा केला. मात्र, विरोधक राजकीय भांडवल करून जनतेत गैरसमज पसरवित असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, ""कॉंग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात बाजार समित्यांच्या कायदादुरूस्ती, तसेच शेतमालाच्या खुल्या व्यापाराची व्यवस्था करण्यात येईल,
नगर ः पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरलेले कौशल्य येथे बिबट्या पकडण्यासाठी वापरावे. जिल्ह्यात बिबटे वाढतात हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला.
येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ""पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. तेथे हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे बिबट्याचा प्रश्न सोडविणे त्यांना अवघड नाही. मात्र, तो सोडविण्याची त्यांची मानसिकता नाही. ते योग्य तो आदेश वन विभागाला देत नाहीत. बिबट्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.''
केरळ, मध्य प्रदेश, आसाम, तेलंगणा येथील मुख्यमंत्र्यांनी जनतेला मोफत कोरोना लस देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील जनतेलाही मोफत लस देण्याचा निर्णय जाहीर करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अरुण मुंडे, राजेंद्र गोंदकर, सुनील रामदासी, प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नगरचे जिल्हाधिकारी राहतात महालात
कृषी कायद्याचे राजकीय भांडवल
केंद्र सरकारने शेतकरीहितासाठी कृषी कायदा केला. मात्र, विरोधक राजकीय भांडवल करून जनतेत गैरसमज पसरवित असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, ""कॉंग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात बाजार समित्यांच्या कायदादुरूस्ती, तसेच शेतमालाच्या खुल्या व्यापाराची व्यवस्था करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, आता तेच या कायद्याविरोधात बोलत आहेत.
एकप्रकारे त्यात राजकारण सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना देशभरात जेथे जास्त भाव, तेथे माल विकता येईल. ई-ट्रेडिंगची सोय मिळणार आहे. बाजारातील मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात.''
भाजपच्या काळात वीज जात नव्हती!
राज्यात 2019पूर्वी कधीही वीज खंडीत होत नव्हती. रोहित्र जळाल्याच्या तक्रारी नव्हत्या. ऑईल संपत नव्हते, संपले तरी तत्काळ देत होतो; पण सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वेळेवर वीज मिळत नाही. मिळाली, तर पूर्ण दाबाने मिळत नाही. संपूर्ण राज्यात नैराश्याचे वातावरण असताना, वीजबिल भरण्यासाठी तगादा केला जात असल्याची टीका शिंदे यांनी केली.