नगर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा कर्मचाऱ्याला चक्कर 

दौलत झावरे
Saturday, 2 January 2021

जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सकाळी साडेदहाच्या सुमारास चक्कर येऊन तो जागीच कोसळला.

अहमदनगर : जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सकाळी साडेदहाच्या सुमारास चक्कर येऊन तो जागीच कोसळला. त्याची तपासणी करून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

मागील आठवड्यात नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभ्यंगत कक्षात मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यापाठोपाठच आज (सोमवारी) शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याला अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. शिक्षण विभागात एका कर्मचाऱ्याला त्रास होत असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधिताची तपासणी करून रुग्णालयात उपाचारासाठी आपल्या खासगी वाहनातून घेऊन गेले.

डॉ. शिंदे यांनी नीलेश चौधरी यांच्या घटनेच्या वेळी त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मागील वर्षीही एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अशाच प्रकारचा त्रास जिल्हा परिषदेत झाला होता. त्यावेळी डॉ. शिंदे मदतीला धावत त्यांनी संबंधिताची तपासणी करून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Once again in Nagar Zilla Parishad the employee got dizzy