पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरुन शिर्डीत एकाचा खून

सतिश वैजापूरकर
Saturday, 21 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय भांगे, विशाल पाटील व रवींद्र बनसोडे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी रवींद्र माळी यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून 11 जणांनी काल (ता. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास माळी यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

शिर्डी (अहमदनगर) : पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून शहरालगतच्या निमगाव हद्दीत  गुरुवार  (ता. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास केलेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. रवींद्र साहेबराव माळी (वय 37) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांतील आठ आरोपींना अटक केली आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
याबाबत मृत रवींद्र यांचा मुलगा रोहित माळी याने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अजय भांगे, विशाल पाटील, रवींद्र बनसोडे, समीर शेख, राजू पठाण, रंजना भांगे, ललिता पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड व कुणाल जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय भांगे, विशाल पाटील व रवींद्र बनसोडे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी रवींद्र माळी यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून 11 जणांनी  गुरुवार  (ता. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास माळी यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवसभरात आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person has been killed in Shirdi after lodging a complaint with the police