आषाढी वारीला राज्यातून याच देवस्थानच्या पादुका जाणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

निळोबाराय महाराज मंदिराच्या प्रांगणातून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निळोबाराय महाराजांच्या समाधीचे व पादुकांचे पूजनानंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

पारनेर ः  नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे प्रस्थान मंगळवारी (ता.30 ) सकाळी आठ वाजता एस टी बस ने होणार आहे.

निळोबाराय महाराज मंदिराच्या प्रांगणातून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निळोबाराय महाराजांच्या समाधीचे व पादुकांचे पूजनानंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

हेही वाचा - श्रीगोंद्यात उपनराध्यक्षपदासाठी अनेकांचे बाशिंग 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी , प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, सहायक पोलीस निरीक्षक रजेश गवळी, निळोबाराय देवस्थान विशवस्त व अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबाराय यांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर  आदींसह भावकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा होणार आहे.

या बाबतची माहीती  कार्याध्यक्ष सावंत यांनी दिली. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील फक्त  दहा ठिकाणच्या संतांच्या पालख्यांना परवानगी दिली आहे, पिंपळऩेरचा नववा क्रमांक आहे.  राज्यातील  पाच संतांपैकी एक संत म्हणून संत निळोबाराय महाराजांची सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळे पंढरपूर येथे निळोबाराय महाराजांच्या पालखीला मानाचा नववा क्रमांक मिळाला आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व सोशल डिस्टंन्स च्या नियमांचे पालन या वेळी करण्यात येणार आहे. 

क्लिक करा - मंत्री तनपुुरेंची तुफान बॅटिंग

राज्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीऐवजी पादुका घेऊन जाण्यास परवनगी मिळालेली देवस्थानांची नांवे पुढीलप्रमाणे, श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण(औरंगाबाद), श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रिंबकेश्वर (नाशिक ), श्री चांगटेश्वर देवस्थान सासवड(पुणे), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड(पुणे ), श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर (जळगाव ), श्री विट्ठल रूखुमाई संस्थान कौंडण्यपुर (अमरावती), श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू (पुणे ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी(पुणे ) श्री संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर (सोलापूर ) व श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर (ऩगर ).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padukas of this temple will go to Ashadi Wari from the state