पारनेर : शहराचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवा

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य
पाणी प्रश्न
पाणी प्रश्नsakal

टाकळी ढोकेश्वर: पारनेर नगरपंचायत निवडणूकीत मतदारांनी तुम्हाला भरभरून मते दिली आता तुमची जबाबदारी वाढली आहे. राज्यात सत्ताही महाविकास आघाडीची आहे. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन माजी आमदार व जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी केले.

पारनेर नगरपंचायतीच्या नुतन उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी आमदार नंदकुमार झावरे यांची त्यांनी भेट घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व उद्योजक अर्जुन भालेकर, गौरव भालेकर उपस्थित होते.

भालेकर म्हणाले, की प्रभागात काम करत असताना महिलांच्या सर्वांगिण विकासाचे विविध उपक्रम आम्ही राबविले आहेत. एकुणच प्रभागाच्या विकासाला प्राधान्य दिल्याने मतदारांनी दुसऱ्यांदा संधी दिली.

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मिळालेल्या या संधीचा उपयोग शहराच्या विकासाठीच होईल ही जबाबदारी सर्वांच्या साथीने पार पाडणार आहोत.

नंदकुमार झावरे; उपनगराध्यक्षपदी निवडीबद्दल भालेकर यांचा सत्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com