esakal | पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Parner will work to change the face of the city

अनेक वर्षापासून ज्यांच्या ताब्यात शहराची सत्ता आहे, त्यांना साधा शहराचा पिण्याच्या पाण्याचा व कचऱ्याचा प्रश्न सोडविता आला नाही.

पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करणार

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : अनेक वर्षापासून ज्यांच्या ताब्यात शहराची सत्ता आहे, त्यांना साधा शहराचा पिण्याच्या पाण्याचा व कचऱ्याचा प्रश्न सोडविता आला नाही. पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच शहरातील रस्ते, नगरपंचायत कार्यालय, अध्यायावत क्रीडा संकुल व बसस्थानक अशी विविध विकास कामे करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी यापुढे काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

शहरातील मुलींच्या प्राथमिक शाळा खोल्यांचे भूमिपूजन लंके यांच्या हस्ते झाले. शहरातील नागरिकांच्या वतीने लंके यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अॅड. पी. आर. कावरे होते. या प्रसंगी सोशल मीडियावर गाजत असलेला गावरान मेवा फेम गणप्या म्हणजे अभिनेते महेश काळे यांनी लंके यांचा जीवनपट उलगडून दाखवला. यावेळी बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, ॲड. राहुल झावरे, सुदाम पवार, संजय मते, विक्रम कळमकर, रा. या. औटी, विजय औटी, नगरसेवक नंदकुमार देशमुख, डॉ. मुदस्सर सय्यद, आनंदा औटी, शैलेंद्र औटी, राजेंद्र खोसे, विजेता सोबले, नंदा देशमाने, वैशाली औटी, संगिता औटी, उमाताई बोरूडे उपस्थीत होते.

आमदार लंके म्हणाले, शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यावर पारनेरकरांना आनंद झाला. परंतु येथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सत्ताधाऱ्यांना काहीच करता आले नाही. या नगरपंचायती विषयी इतर ठिकाणी बोलताना कमीपणा वाटतो.  सत्ताधाऱ्यांना नगरपंचायतने कर्मचाऱ्यांचे प्रश्नही सोडविले नाहीत. कर्मचारी अधिकृतपणे नगरपंचायतकडे वर्ग नाही. तसेच पाच वर्षापासून सत्ता असूनही साधा नगरपंचायतीसाठी स्वमालकीची इमारतही सुद्धा बांधता आली नसल्याचेही लंके म्हणाले. शहरातील रस्ता दुपदरीकरण, चौकाचे सुशोभिकरण करूण आपण शहराचा चेहरा- मोहरा बदलून पारनेरचे नाव हे राज्यात झळकेल असे आदर्शवत काम करणार असल्याचेही शेवटी लंके म्हणाले.

नगरसेवक डॉ. मुद्दस्सर सय्यद सत्तेत असूनही आमची कामे झाली नाहीत. पुर्वीच्या नेतृत्वाकडून कायमच अपमानास्पद वागणूक मिळाली. शहराचा पाणी प्रश्न हा फक्त आमदार लंकेच सोडवू शकतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आम्ही पाचही नगरसेवक लंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर आलो आहोत. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top