
शेतकर्यांचे आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने देशात केलेले नवीन कृषी कायदे शेतकर्यांसाठी घातक असून, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहेत. त्यासाठी हे कृषी कायदे रद्द करावेत.
पारनेर : शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा भुमीपुत्र शेतकरी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने पारनेर येथे लाल चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधात या वेळी निदर्शने केली. आंदोलनात संतोष वाडेकर, राजेंद्र करंदीकर, अविनाश देशमुख,अॅड पी आर कावरे, गुलाबराव डेरे, सुभाष गायकवाड, अशोक आंधळे, सुरेश गायकवाड, संतोष वाबळे, संतोष खोडदे, अमोल ठुबे, अयुबभाई शेख आदि सहभागी झाले होते.
या वेळी दिल्ली येथे दहा दिवसापासून सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
शेतकर्यांचे आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने देशात केलेले नवीन कृषी कायदे शेतकर्यांसाठी घातक असून, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहेत. त्यासाठी हे कृषी कायदे रद्द करावेत, शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, निर्धारित हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्या व्यापार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षेची तरतुद करावी अश्या मागण्या करण्यात आल्या .
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी आंदोलनात उपस्थित राहुन पाठिंबा दिला.