पाथर्डीत कोरोनाने घेतला २१ जणांचा बळी

In Pathardi, Corona killed 21 people
In Pathardi, Corona killed 21 people

पाथर्डी : तालुक्‍यात आतापर्यंत सहा हजार 819 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. अठराशे चौऱ्यांशी जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैंकी सोळाशे छपन्न रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दोनशे अठ्ठावीस जण पाथर्डीच्या कोविड सेंटरमधे उपचार घेत आहेत. एकवीस जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

कोरोनाच्या काळात उपचार करणाऱ्या सर्व कोरोनायोद्धयांना सामान्य माणूस सलाम करीत आहे. पाथर्डी तालुक्‍यात सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन व महसूल, पोलिस, आरोग्य विभागाने घेतलेल्या काळजीने कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात झाला.

तालुक्‍यातील सुमारे तीस ते चाळीस टक्के लोक रोजगार व नोकरीनिमित्त राज्यभर आणि पुन्हा गावी आले. परिणामी जुलै व ऑगस्ट महिन्यांत कोरोनाचा प्रसार वाढला. विवाह व अत्यंविधीच्या प्रसंगामुळे तालुक्‍यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. 

पाथर्डीत उपजिल्हा रुग्णालय व श्रीतिलोक जैन विद्यालयात दोन कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. 1113 जणांच्या घशातील स्त्रावांची तपासणी नगर येथे करण्यात आली. 5756 जणांची पाथर्डीत अँन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यापैंकी 1884 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकवीसजणांचा जिव गेला आहे. दोनशे अठ्ठावीस जण उपचार घेत आहेत. 1656 जण बरे होवुन घरी परतले आहेत. कोरोनामधुन बरे होण्याचे प्रमाण 85.55 टक्के आहे. अतिशय चांगले काम कोरोना योद्‌ध्यांनी केले आहे. 

तालुक्‍यात कोरोनाच्या कालावधीत आरोग्य यंत्रणेने अतिशय चांगले काम केले आहे. हे टीमर्क आहे. रुग्णांची सेवा करताना कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आवाहन यंत्रणेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याने केले आहे. श्रीतिलोक जैन विद्यालय येथे व उपजिल्हा रुग्णालयात कोवीड सेंटर सुरु केलेले आहेत. सोशल डिस्ट्‌न्स पाळुन सहकार्य करावे.

- डॉ.अशोक कराळे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी.

संपादन - अशोक निंबाळकर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com