कोरोना लसीकरणानंतर उलट्या, मळमळ; जिल्हाधिकारी म्हणाले, हा किरकोळ प्रकार

corona vacciantion
corona vacciantion

नगर ः जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) कोरोना लसीकरणास सुरवात झाली. पहिल्या दिवशी 1200 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. पैकी 871 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यातील चौघांना लस दिल्यानंतर किरकोळ त्रास जाणवला. मात्र, त्यामुळे लसीबाबत कोणीही भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. 

ते म्हणाले, की जिल्ह्यासाठी लसीचे 32 हजार 900 डोस उपलब्ध झाले आहेत. पैकी महापालिका क्षेत्रासाठी साडेसात हजार व लष्करातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 310, उर्वरित 25 हजार 400 डोस ग्रामीण भागासाठी दिले आहेत.

लसीकरणासाठी महापालिका क्षेत्रात चार, ग्रामीण भागासाठी आठ, असे एकूण 12 केंद्रे सुरू केले आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस देणे अपेक्षित आहे. 

पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील चार केंद्रांवर 261, तर ग्रामीण भागातील आठ केंद्रावर 610, असे एकूण 871 (72 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लसीकरणानंतर चौघांना किरकोळ त्रास जाणवला. मात्र, कुठलीही लस घेतल्यानंतर असा त्रास काहींना जाणवतो. त्यामुळे कोरोना लसीबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com