esakal | पारनेर- सुपे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण; दुरूस्ती न झाल्यास आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Plantation in a pit on Parner Supe Road

पारनेर तालुक्‍याच्या द्रुष्टीने महत्वाचा व वर्दळीचा रस्ता असलेल्या पारनेर- सुपे मार्गवर अनेक खड्डे पडले आहेत.

पारनेर- सुपे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण; दुरूस्ती न झाल्यास आंदोलन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍याच्या द्रुष्टीने महत्वाचा व वर्दळीचा रस्ता असलेल्या पारनेर- सुपे मार्गवर अनेक खड्डे पडले आहेत. या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याच्या त्वरीत दुरूस्ती करावी या मागणीसाठी या रस्त्यावरील खड्ड्यांमधे पारनेर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 

या वेळी तालुका उपाध्यक्ष सतिष म्हस्के, अविनाश औटी, निखिल बोरकर, रियाज राजे, सतिष औटी, संतोष औटी, आकाश चेडे, संदीप नगरे आदी उपस्थित होते.
या वेळी शहराध्यक्ष वसिम राजे म्हणाले, पारनेर- सुपे या १३ किलोमिटरवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्डे चुकवताना अनेकदा अपघात होतात.

रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली खड्ड्यांमधे रस्त्याच्या कडेची माती भरण्यात येते. त्यामुळे पाऊस पडल्यावर रस्त्यावर चिखल होतो. वाहने घसरुन अपघात होतात. हे टाळण्यासाठी खराख झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्‍यक आहे. असेही राजे म्हणाले. 

पारनेर-सुपे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा पारनेर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजे यांनी दिला आहे.  
पाऊस उघडल्यावर लगेचच दुरूस्ती. 

सततच्या पावसामुळे पारनेर-सुपे रस्त्यासह इतर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.पाऊस सुरू असताना डांबरमिश्रीत खडीने खड्डे बुजवणे शक्‍य नसल्याने मुरूमाने खड्डे बुजवण्यात आले होते.मात्र सततच्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले.पावसाने उघडीप दिल्यावर लगेचच डांबरमिश्रीत खडीने खड्डे बुजवण्यात येतील. 
- श्रीरंग देवकुळे, उपअभियंता, पारनेर 

संपादन : अशोक मुरुमकर