Shirdi News : मोदींमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi improves economy
शिर्डी : मोदींमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा

शिर्डी : मोदींमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा

शिर्डी : कोविड संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी व दूरदर्शी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारते आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यात शिर्डी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

लोणी (ता. राहाता) येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, जनसेवा फाउंडेशन व समाज कल्‍याण विभागाच्या वतीने शबरी घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, आम आदमी अपघात विमा योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे तसेच दिव्यांगांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

पंचायत समिती सभापती नंदाबाई तांबे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य कविता लहारे, दिनेश बर्डे, गणेश कारखान्‍याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, उपसभापती बाळासाहेब जपे, सुजित गोंदकर, धनंजय दळे, स‍लीम शहा, कैलास सदाफळ, उपसरपंच गणेश विखे, युवा मोर्चाचे तालुका अध्‍यक्ष सतीश बावके उपस्थित होते. डॉ. विखे पाटील म्‍हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात ९८ टक्‍के कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. चाळीस हजार कुटुंबांना शिधापत्रिका दिल्या आहेत. प्रवरा परिवार कायम जनतेसोबत असतो. मतदार संघ हे आपले कुटुंब आहे. सर्वांनी संघटित राहून विकास कामात साथ द्यावी. दिव्यांगांनी वाटप केलेल्या साहित्याचे योग्य वापर करावा, असेही ते म्हणाले.

Web Title: Pm Narendra Modi Improves Economy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top