esakal | कर्जत शहरातील दुकाने फोडून सामान लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले

बोलून बातमी शोधा

karjat

कारखाना रोड, राशीन येथे सुद्धा दोन लाख रुपयांचा किराणा माल शटर उचकटून चोरून नेला होता. त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सलिम शेख करीत आहेत.

कर्जतमधील दुकाने फोडून सामान लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : शहरातील दुकाने फोडून माल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. त्याने कर्जत आणि राशीन येथे दोन लाख बारा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

हेही वाचा: जळीत झालेल्या उसतोडणी कामगारांना उदयन गडाखांनी केली तातडीची मदत

अविनाश संजय राऊत (वय २७), व्यवसाय किराणा दुकान, (रा. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून जेवढ्या उर्फ देविदास काळे, (वय २९वर्ष), रा.बारडगाव दगडी, (ता. कर्जत) यास अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादीचे किराणा दुकानातील आठ हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे, इंद्रायणी तांदूळ कट्टा व सुटे पैसे असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच कारखाना रोड, राशीन येथे सुद्धा दोन लाख रुपयांचा किराणा माल शटर उचकटून चोरून नेला होता. त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सलिम शेख करीत आहेत.

हेही वाचा: प्रशासकीय अधिकाऱ्यांची वेल्डिंग दुकानावर धडक कारवाई

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, शाम जाधव, भाऊ काळे, सुनील म्हेत्रे, देवा पळसे यांनी केली.