esakal | अकोलेत आजी- माजी आमदारांमध्ये पीएवरुन जुंपली
sakal

बोलून बातमी शोधा

Political story between Vaibhav Peechad and Kiran Lahamate in Akole taluka

अकोले सध्या तालुक्यात आमदारांचे स्वीयसहायक यांच्या हप्ता वसुली व नव्या कारची चर्चा जोरदार सुरू आहे.

अकोलेत आजी- माजी आमदारांमध्ये पीएवरुन जुंपली

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : सध्या तालुक्यात आमदारांचे स्वीयसहायक यांच्या हप्ता वसुली व नव्या कारची चर्चा जोरदार सुरू आहे. भाजपच्या मोर्चात ही अनेक वक्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली आहे. यावर आश्चर्य व्यक्त करत आपण या विषयावर योग्य वेळ आल्यावर बोलू, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी म्हटले आहे.

आमदार किरण लहामटे यांनी मात्र पीएची पाठराखण करत हे माझ्या पीए विरोधात व मला बदनाम करण्याचे षड यंत्र असल्याचे  म्हटलं आहे. त्यामुळे तालुक्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचारात आमदारांनी मी खाणार नाही व खाऊन देणार नाही. ही पंतप्रधान मोदींची री ओढली तिलाच छेद गेला की काय अशी चर्चा जनसामान्यांनमध्ये असून हे प्रकरण येणाऱ्या व होऊ घातलेल्या निवडणुकात गाजणार आहे अशी चिन्हे आहेत. 

विरोधक व महाआघाडी यांच्यात कलगी तुरा रंगणार असे चिन्ह दिसू लागले आहे. तर चाळीस वर्षात काय केले या प्रश्नाला अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ 29लाखाचा मोबदला देणार असाल तर मग चाळीस वर्षात ज्या पद्धतीने सरकार दरबारी भांडून पाठपुरावा करून तालुक्याला कोट्यवधी रुपयांची भरघोस मदत मिळाली त्याबाबत लोकप्रतिनिधी आत्मपरीक्षण करणार का? असा प्रती सवाल भाजपने विचारला आहे. 

तालुक्यात अनेक शुशिक्षित होतकरू तरुण आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता देखील आहे. मग पीए संगमनेर चाच का? या मागे काही गुप्त कारनामे नाही ना असेही विरोधकांनी म्हटले आहे. तर स्वीय सहायक याने घेतलेल्या वातानाकुलीत कार बाबत तालुक्यात जोरदार चर्चा आहे. तर ठेकेदार मंडळीही रडारवर आली आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर 

loading image