विलासराव देशमुख यांच्या कार्यक्रमावर नामदेवराव जगताप गटाने टाकला होता बहिष्कार

The political story of Vilasrao Deshmukh and Namdevrao Jagtap
The political story of Vilasrao Deshmukh and Namdevrao Jagtap

अहमदनगर : सोलापूर जिल्ह्यात स्व. नामदेवराव जगताप यांचे वर्चस्व होते. जिल्ह्याच्या राजकारणात ते नेहमीच चर्चेत असत. जिल्हाला वैभव प्राप्त करुन दिले त्या उजनी धरणाच्या निर्मातीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचा उपयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा म्हणून त्यांनी जागा बदली होती. येथील धरणग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उजनी बॅकवॉटरच्या भागात १९८४ मध्ये झालेल्या विलासराव देशमुख यांच्या कार्यक्रमावर त्यांच्या गटाने बहिष्कार टाकला होता. 

हेही वाचा : ...अन्यथा राज्यात राज्यपाल हटाव मोहिम सुरु होईल, त्याचा फटका भाजपलाच बसेल
सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला उजनी धरणाने वैभव प्राप्त करून दिलं. फक्त शेतीच नाही तर उद्योगांना आणि पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण या भागाला या धरणातूनच पाणी जाते. हे धरण आता ज्या ठिकाणी आहे, तिथे नव्हे तर दुसऱ्याच ठिकाणी होणार होते. मात्र, जास्त नागरिकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून जागा बदलण्यात आली. हे धरण माढा तालुक्‍यात येते. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या भीमा नदीवर हे धरण बांधलं आहे. याची क्षमता आहे 121 टीएमसी पाणीसाठ्याची आहे. यात सर्वाधिक क्षेत्र हे करमाळा तालुक्‍यातील गेले आहे. धरण होण्यापूर्वी येथील बरीच शेती पाण्याअभावी मोकळी होती. काम नसल्याने गावातली बहुतांश कुटुंब स्थलांतरित होत होती.

जून 1980 ला हे उजनी धरण पूर्ण झालं. उजनीचं पाणी आलं आणि गावे झपाट्याने बदलली. हा बदल केवळ यशवंतराव चव्हाणांच्या कल्पकतेमुळे झाला. शरद पवारांनी या धरणाला मूर्त स्वरूप दिलं. हे धरण सोलापुरात पाऊस नाही झाला तरी पुण्याच्या पावसाने भरते. सोलापूरकरांच्या दृष्टीने पंढरपूरच्या विठोबा इतकंच उजनी धरण दैवत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या दूरदृष्टीने आणि शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या जिद्दीने हे साकारण्यात आलेलं हे धरण आहे. या धरणाचा जास्तीत जास्त नागरिकांना उपयोग व्हावा म्हणून (कै.) नामदेवराव जगताप यांच्या प्रयत्नाने जागा बदलण्यात आली होती. या धरणाची जागा पारेवाडीजवळ निश्‍चित झाली होती. मात्र, माढा तालुका, सोलापूर व त्याखालील भागालाही पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून धरणाची जागा बदलण्यात आली. हा भाग पूर्णतः दुष्काळी होती. 

हेही वाचा : निवडणुकीतील खरा ग्राऊंड रिपोर्ट काँग्रेस नेत्याला देऊन गेला आमदारकी
शेतीशिवाय दुसरा काहीच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. धरण होणार अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा कोणाला खरं वाटत नव्हतं. या भागात तेव्हा पुरेशी जागृती नव्हती. त्यामुळे धरण होणार यावर कोणाचाही विश्‍वास बसला नाही. मात्र, जेव्हा धरणाचे उद्‌घाटन झाले. तेव्हा काही तरी होणार अशी आशा वाटू लागली. त्यानंतर प्रत्यक्ष अधिग्रहण सुरू झाले आणि धरणाचे काम सुरू झाले.

या भागात झालेल्या विलासराव देशमुख यांच्या कार्यक्रमावर नमदेवराव जगताप गटाने बहिष्कार टाकला होता. राज्य सरकारचा कृषिरत्न पुरस्कार मिळालेले आनंद कोठडिया यांच्या संग्रहात याबाबतचे काही कात्रणे आहेत.

काय होता कार्यक्रम
करमाळा तालुक्यातील कंदर येथील यशोबा- भीमा खोरे सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे उद्‌घाटन तत्कालीन गृहराज्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. याबाबत १९ ऑक्टोबर १९८४ ला ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार या कार्यक्रमात संयोजकांनी काँग्रेसचे आमदार नामदेवराव जगताप यांच्यावर टीका केली होती. मात्र, देशमुख त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यावेळचे आमदार जगताप यांच्या कार्यमर्त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

या कार्यक्रमात देशमुख म्हणाले होते की, प्रथम पुनर्वसन व नंतर धरण बांधणे असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. पुनर्वसनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते.  उद्‌घाटन झालेल्या योजनेला तेव्हा 35 लाख खर्च आला होता. त्यापैकी 33 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज राज्य भू- विकास बँकेने दिले होते. या कार्यक्रमानंतर करमाळा पंचायत समितीतर्फे प्राथमिक शिक्षक, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते झाला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी माढ्याचे आमदार धनाजीराव साठी होते. या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील देणार होते. पण त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीचे बोलणे झाले म्हणून ते आले नाव्हते, असं या वृत्तात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com