शिवसेनेत विजय औटी यांचे स्थान पहिल्यासारखेच... ‘ते’ नगरसेवक भुमिकेवर ठाम

सनी सोनावळे 
Wednesday, 15 July 2020

मी शिवसेनेचा कडवा शिवसैनिक आहे. जी जबाबदारी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ती पार पाडत आहे. महाविकास आघाडीची पारनेर तालुक्याची जबाबदारी कोणालाही दिली नाही. शिवसेनेतील विजय औटी यांचे स्थान पहील्यासारखेच आहे. ते डळमळीत झाल्यासारखे वाटत नाही. मी नगरसेवक व औटी यांच्यामध्ये समन्वयक म्हणुन काम पाहत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावगर यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मी शिवसेनेचा कडवा शिवसैनिक आहे. जी जबाबदारी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ती पार पाडत आहे. महाविकास आघाडीची पारनेर तालुक्याची जबाबदारी कोणालाही दिली नाही. शिवसेनेतील विजय औटी यांचे स्थान पहील्यासारखेच आहे. ते डळमळीत झाल्यासारखे वाटत नाही. मी नगरसेवक व औटी यांच्यामध्ये समन्वयक म्हणुन काम पाहत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावगर यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.
पारनेर येथे कोरेगावगर यांनी पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वप्रथम विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची भेट घेतली व त्यानंतर आमदार निलेश लंके यांच्यासोबत पाच नगरसेवकांची भेट घेतली. याबाबत कोरेगावगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेटीचा आशय सांगितला. कोरेगावगर म्हणाले, औटींसोबत चर्चा झाली आहे. यामध्ये अनेक वेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीचा आशय पक्षप्रमुखांना सांगण्यात येईल नगरसेवकांच्या विषयाबाबत
औटी यांचीच प्रतिक्रिया घ्या. नगरसेवकांशी देखील सकारात्मक चर्चा झाली. शिवसेनेची मदार ही कोणालाही दिली नाही. त्याकरिता संघटना आहे. त्या पद्धतीने जिल्हाप्रमुख,उप जिल्हाप्रमुख यासंह अन्य सदस्यांच्या माध्यमातून ते सुरू आसते मी कुठेही वेटींगला थांबलो नाही. या अफवा विनाकारण पसरविल्या जात आहेत. शिवसेना वाढविण्याची जबाबदारी शिवसैनिकावर आहे. ती संपविण्यासाठी नाही आमचे काम आम्ही योग्य पद्धतीने पुढे नेत आहोत. पक्षाचे काम पक्षप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणेच सुरू आहे.

शिवसेनेशी समझोता मात्र औंटीशी नाही
शिवसेनेचे नगरसेवक किसन गंधाडे म्हणाले, आम्ही पाणी योजनेच्या प्रश्नाकरीताच बाहेर पडलो होतो. आजही संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याशी बैठक झाली. ती सकारात्मक झाली. यामध्ये आम्ही पाणी योजनेवरच बोलो. आम्ही रीतसर पास काढुन मुंबई येथे गेलो होतो. आम्ही होम क्वारंटाईन स्वतःच होणार होतो. औटी यांनी मात्र तेथीही राजकारण करत आम्हाला नगरपंचायत मार्फत नोटीस बजावण्यास सांगितल्या हे चुकीचे आहे. आमचा समजोता शिवसेनेशी झाला आहे. मात्र औंटीशी नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics story of Shivsena corporator and Vijay Auti in Parner taluka