गावाची ओळख असेल्या दगडी गोदामाला चिरा पडल्यामुळे कोसळण्याची भिती

प्रवीण पाटील
Wednesday, 30 September 2020

जुन्या शासकीय दगडी गोदामाचे अतीवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. दगडी भिंतीना तडे गेले आहेत. 

बोधेगाव (अहमदनगर) : येथील जुन्या शासकीय दगडी गोदामाचे अतीवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. दगडी भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे महसुल विभागाने तातडीने पाहणी करुन दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामसचिवालयासमोरील महसुल विभागाचे जुने दगडी गोदाम आहे. पुर्वीच्या काळी दुष्काळात धान्य, जनावरांसाठी गवताचे मोठ- मोठी गठ्ठे या गोदामत साठली जायची व इथून परिसरातील गावात वितरीत होत असे. पुर्व व पश्‍चिम अशा दोनही बाजूने २० फुटी रस्ता आहे. आतमध्ये ट्रक फिरेल इतका मोठा अवारा आहे. हे महाकाय गोदाम गावाची ओळख आहे. परंतू मागील अनेक वर्षापासून हे गोदाम कायमस्वरुपी बंद आहे. त्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी छताचे पत्रे उचकटून वाऱ्याने उडून गेले आहे. त्यामुळे आत पाणी साचले जात आहे. 

यावर्षीच्या अती पावसामुळे या गोदामाला सगळ्याच बाजूने चिरा पडल्या आहेत. काही बाजूच्या भिंतीची दगडे खाली पडले आहेत. सगळ्या बाजूने काटेरी झुडपे व वेलीनी हे गोदाम वेढले गेले आहे.

संबंधीत विभागाने याची योग्यवेळी देखभाल दुरुस्ती केलीच नाही. हे अनेक दिवसापासून बंद आहे. त्यामुळे यावर्षीच्या अती पावसामुळे याला मोठ्या प्रमाणात चिरा पडल्या आहेत. हे कधीही कोसळू शकते याच्या जवळून गावातला मुख्य रस्ता जात. उद्या जर दुर्घटना घडली तर त्यांची जबाबदारी संबंधीत विभागाची असेल. 
- सुनिल खंडागळे, कार्यकर्ते, राष्ट्रवादी कॉग्रेस 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of warehouse collapse in Bodhogaon