esakal | नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

eyes donation

नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात नऊ दुर्गांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करुन समाजात नेत्रदान चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात २५३ रुग्णांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरातून निवड झालेल्या ४३ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दानवे यांनी केले. राजेंद्र बोरुडे यांनी आभार मानले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, किरण कवडे, डॉ. विशाल घंगाळे, डॉ. शरद कौठुळे, राजेंद्र बोरुडे, वैभव दानवे, वैभव देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दिवाळीआधी भारतीय बाजारात 'हे' IPO येणार?

हेही वाचा: घरात पैसे नाही,तर कलेक्टरने कुलूप का लावले? चोराचे पत्र VIRAL

loading image
go to top