बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार त्यांनी गमावलाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praveen Darekar Family visit to Sai Samadhi shirdi

बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार त्यांनी गमावलाय

शिर्डी - मी शिवसेना सोडणार नाही, असे खासदार संजय राऊत म्हणतात मात्र त्यांना शिवसेना सोडायला सांगतोय कोण ? माझी विनंती आहे, आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढ्या लवकर ती संपेल. दोन्ही कॉँग्रेससोबत आघाडी केल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ वगैरे घेण्याचा अधिकार त्यांनी केव्हाच गमावलाय, अशी टिका भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

आज त्यांनी येथे येऊन साईसमाधीचे सहकुटूंब सहपरिवार दर्शन घेतले. माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, शहराध्यक्ष सचिन शिंदे, सुधीर शिंदे, योगेश गोंदकर, लखन बेलदार आणि नरेश सुराणा आदिंनी त्यांचे स्वागत केले.

दरेकर म्हणाले, समजा राऊतांनी शिवसेना सोडली तरी त्यांना भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत घेणार नाही. त्यांनी शिवसेनेतच राहावे, त्यांनी काही केले नसेल तर ईडीला घाबरण्याचे कारण नाही. कर नाही त्याला डर कशाला. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नातून शिंदे-फडवणवीस सरकार मार्ग काढेल. या नव्या सरकारला साईबाबांचे आशिर्वाद लाभावेत आणि देशातील सर्वोत्तम सरकार म्हणून ते ओळखले जावे.

Web Title: Praveen Darekar Family Visit To Sai Samadhi Shirdi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..